Thursday, August 19, 2010

नेत्रदानाचा संकल्प करा

आज आहे जागतिक छायाचित्रण दिन !

आपल्यापैकी बऱ्याच जणांना छायाचित्रणाची आवड असतेच. पूर्वी हा थोडा महागडा छंद जोपासणे कठीण वाटायचे परंतु आता आलेल्या डीजीटल कॅमेरयांमुळे अशी परिस्थिती राहिलेली नसून छायाचित्रणही फारच सोपे झाले आहे. निरागस,गोंडस बालके,प्रियजन,निसर्गाची विविध रूपे,विविध वस्तू,रंग आपण कॅमेऱ्यात टिपू शकतो,काही जणांना नुसता आस्वाद घ्यायलाही आवडतो. आपल्याला नेत्र असल्यामुळेच हे सर्व करू शकतो, आस्वाद तसेच आनंद घेऊ शकतो.

ज्यांना नेत्रच नाहीत, अमूल्य दृष्टीच नाही त्यांचे काय?
त्यांचा असा विचार आपण कधी केला आहे काय?
नसल्यास अशा दृष्टिहीन देश बांधवांचाही जरूर विचार करा,
त्यांच्यासाठी नेत्रदानाचा संकल्प करा.

No comments:

Post a Comment